PM Narendra Modi : अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक २२ जानेवारी रोजी होणार आहे, परंतु त्यांची पूजा सात दिवस आधी म्हणजेच १५ जानेवारीपासून सुरू होईल. प्राणप्रतिष्ठा पूजेबरोबरच भगवान सोन्याचे कपडे परिधान करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेलही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित असतील.

226
PM Narendra Modi : अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज म्हणजेच शनिवार ३० डिसेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी नागरी सुविधा सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ११,१०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे ते उद्घाटन आणि पायाभरणी करतील. प्रमुख कार्यक्रमांमध्ये अयोध्या विमानतळाचे उद्घाटन आणि लगतच्या श्री राम मंदिर आणि अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या वास्तुकलेचे चित्रण करणाऱ्या अंतिम इमारतीचा दर्शनी भाग यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; तब्बल १२२ क्षेपणास्त्रे आणि ३६ ड्रोनचे प्रक्षेपण)

‘या’ गोष्टींचे उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी

पीआयबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतप्रधान (PM Narendra Modi) दोन नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. यासह, देशात अमृत भारत ट्रेनचे परिचालन सुरू होईल. ते वंदे भारतच्या सहा नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. शेजारच्या श्री राम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने विकसित, रुंदीकृत आणि सुशोभित केलेल्या चार रस्त्यांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. तसेच पंतप्रधान मोदी अयोध्या धाममध्ये २१८० कोटी रुपये खर्चून विकसित होत असलेल्या ग्रीनफिल्ड टाउनशिप प्रकल्पाची पायाभरणी करतील. ते उत्तर प्रदेशात ४६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करतील.

(हेही वाचा – Weather Update : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वरुणराजा देखील सज्ज)

आमचे सरकार अयोध्येचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी वचनबद्ध –

आमचे सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि भगवान श्री राम यांचे शहर असलेल्या अयोध्येचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे. याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “या दिशेने मी उद्या नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचे आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहे. यासह, मला आणखी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे अयोध्या आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या अनेक भागांतील माझ्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सोपे होईल.”

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : भाविकांना आरतीसाठी ऑनलाईन पास बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या कुठे करायचे बुकिंग)

पंतप्रधान (PM Narendra Modi) प्रथम पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना आज सकाळी ११:१५ वाजता हिरवा झेंडा दाखवतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.