PM Narendra Modi १२ जानेवारीपासून प्रचाराचा शुभारंभ करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे १२ जानेवारीला नाशिक मध्ये येत आहेत, तर २३ जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन हे नाशिक मध्ये होत आहे. शिवसेना या अधिवेशनामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यापूर्वीच मोदी यांचा हा दौरा होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

226
PM Narendra Modi पुन्हा एकदा रशिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या १२ जानेवारीला नाशिक मध्ये येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेसाठी केंद्रीय पथक देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या अधिवेशनापूर्वी भाजपा राज्यात लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार हे आता स्पष्ट होत आहे.

१२ जानेवारी या दिवशी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक केंद्राद्वारा आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. त्यांच्या ज्या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षतेचा आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्रीय पथक हे नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी तोपवनातील मोदी मैदान या ठिकाणाचा पाहणी दौरा केला तसेच ओझर विमानतळ आणि अन्य परिसराचा दौरा करून पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

(हेही वाचा – Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश)

दरम्यान दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा हा दौरा राजकीय दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रदेश भाजपाने या दौऱ्यावरती लक्ष केंद्रित केले असून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे काही नेते देखील नाशिकचा दौरा करणार आहे. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग देखील या दौऱ्याच्या निमित्याने फुंकले जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन केले जात आहे.

(हेही वाचा – PM Jan Dhan Yojana : जन धन योजनेंतर्गत उघडलेली 10 कोटी खाती आहेत निष्क्रीय, 12000 कोटी रुपये कोणाचे ?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यापूर्वीच निश्चित झाला होता. त्यामुळे शिवसेना अधिवेशनाच्या आधी कोणतेही राजकीय नाट्य नसल्याचे देखील भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे १२ जानेवारीला नाशिक मध्ये येत आहेत, तर २३ जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन हे नाशिक मध्ये होत आहे. शिवसेना या अधिवेशनामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यापूर्वीच मोदी (PM Narendra Modi) यांचा हा दौरा होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.