पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज म्हणजेच रविवार ३१ मार्च रोजी मेरठ येथून एनडीएच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह उपस्थित असणार आहेत. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Sanjeev Balyan : भाजपा उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला; वाहनांची तोडफोड)
मेरठ येथून पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा करणार प्रचाराला सुरुवात :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मोदीपुरम येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ येथून मोदी तिसऱ्यांदा लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ते बागपत, मेरठ, हापूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, कैराना, सहारनपूर, गाझियाबाद, बुलंदशहर आणि गौतम बुद्ध नगर या लोकसभा मतदारसंघातून प्रचार करतील. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – #ClickHere हा प्रकार नक्की आहे तरी काय? जाणून घ्या)
रॅलीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था :
आज होणारी मोदींची (PM Narendra Modi) रॅली यशस्वी करण्यासाठी भाजपा आणि आरएलडीचे कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून मेरठमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरीही उपस्थित होते. रॅलीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community