अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. १३ फेब्रुवारीपासून हा दौरा होणार असल्याची माहिती आहे. त्यावेळी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण व्यापार आणि लष्करी भागीदारी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. या बैठकीमुळे आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. विशेषत: इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्वातंत्र्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांचे विचार एकसारखे आहेत. 2016 मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदाराचा दर्जा दिला, ज्याने दोन्ही देशांमधील संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणास गती दिली. या शिवाय 2018 मध्ये भारताला स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथोरायझेशन टियर-1 (STA-1) दर्जा देण्यात आला. या बैठकीत संरक्षण करारांवर विस्तारपूर्वक चर्चा होऊ शकते. या बैठकीत या लष्करी सरावांचा आणखी विस्तार करण्यावर एकमत होऊ शकते. क्वाड देश अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत सुरक्षा रणनीती आणखी पुढे नेण्यासाठी योजना तयार केल्या जाऊ शकतात. (PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community