PM Narendra Modi जाणार रशियाच्या दौऱ्यावर

155
India's Universities: जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील महिन्यात रशियाला भेट देऊ शकतात. खुद्द रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात रशियाला भेट देणार असल्याची घोषणा क्रेमलिनने केली. (PM Narendra Modi)

व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र व्यवहार सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे, परंतु त्यांनी तारीख सांगितली नाही. जर ही भेट झाली, तर जवळपास ५ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच रशियाला भेट असेल. मोदींनी सप्टेंबर २०१९ मध्ये रशियाला भेट दिली. संयुक्तपणे तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे उशाकोव्ह यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्याबाबत भारताकडून कोणतेही दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शेवटचे रशियाला गेले होते. मात्र, आता वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. पुतिन यांनी या वर्षी मे महिन्यात सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती, तर नरेंद्र मोदी यांनीही ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. जर ही भेट झाली तर फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींची ही पहिलीच रशियाला भेट असेल. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचे निलंबन)

क्रेमलिनचे अधिकारी युरी उशाकोव्ह म्हणाले की, मी पुष्टी करू शकतो की आम्ही भारतीय पंतप्रधानांच्या भेटीची तयारी करत आहोत. जर मोदी रशियाला गेले तर ते आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद आयोजित करतील. भारताचे पंतप्रधान (PM Narendra Modi) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील ही वार्षिक शिखर परिषद दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीतील एक उच्चस्तरीय संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे. आत्तापर्यंत भारत आणि रशिया यांच्यात अनुक्रमे २१ वार्षिक शिखर परिषदा एकमेकांच्या देशांमध्ये झाल्या आहेत. शेवटची शिखर परिषद ६ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झाली. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. यामुळेच भारताने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध करण्यास टाळाटाळ केली आहे. अमेरिकेच्या सुरुवातीच्या दबावानंतरही नवी दिल्लीने रशियन क्रूडची खरेदी वाढवली आहे. देशांतर्गत तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे भारताचे म्हणणे आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.