विरोधकांनी संसदेत आणलेला अविश्वास प्रस्ताव No Confidence Motion मोदी सरकारने जिंकला. विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे हा प्रस्ताव आवाजी मतदानाने पास करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होती. शेवटी पंतप्रधान मोदी यांनी २ तास १२ मिनिटांचे भाषण करत उत्तर दिले, पण मतदानाच्या आधी, मोदींच्या मणिपूरच्या भाषणाच्या आधीच विरोधकांनी सभात्याग केला. नंतर आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आले, त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारचा विजय झाला आहे.
आज मतदानाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा भाजपसाठी शुभ संकेत असतो, त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप विक्रमी जागा मिळवून सत्तेत येणार असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मणिपूरमध्ये आज जी काही समस्या आहे ती काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याची टीका पंतप्रधानांनी केली. विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईशान्य भारत आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास करणे हेच ध्येय असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितले. काँग्रेसने ईशान्य भारताकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असून आमच्यामुळे पहिल्यांदाच ईशान्य भारताचा विकास होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)
Join Our WhatsApp Community