भारताने केवळ 18 महिन्यांत 200 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोनाचे लसीकरण सुरु करण्यात आले. देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे. भारत सरकारकडून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर राबवली गेली. ज्या अंतर्गत आता भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांना एक पत्र लिहिले आहे.
( हेही वाचा: GST on Room Rent: घरभाड्यावर कोणाला भरावा लागणार 18 टक्के GST; जाणून घ्या सविस्तर )
भावी पिढीला अभिमान वाटेल
भारताने 200 कोटी नागरिकांना लस देण्याचा टप्पा ओलांडला असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांचे कौतुक केले आहे. तुमच्यासारख्या नागरिकांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. कोरोना काळात भारताने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल, असे या पत्रात म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी लसीकरणकर्ते, आरोग्य कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देशातील नागिरकांना सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला भारताने दिलेला वेग आणि कव्हरेज उत्कृष्ठ आहे, असे पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community