पंतप्रधान मोदींच्या भावाच्या गाडीला म्हैसूरजवळ भीषण अपघात, रुग्णालयात दाखल

134

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासह कारमध्ये त्यांचा मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा आज, मंगळवारी दुपारी कर्नाटकातील म्हैसूरजवळ अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

(हेही वाचा – Income Tax भरणाऱ्यांना मोठा दिलासा! आयकरमध्ये मिळणार सूट? नवा आदेश जारी)

काय आहे घटना

प्रल्हाद मोदी हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवासह बंदीपुरा येथे मर्सिडीज बेंझ कारमधून बंदीपूरला जात होते. दुपारी २ च्या सुमारास कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातावेळी त्यांच्यासह त्यांचा ताफाही प्रवास करत होता. या सर्वांना किरकोळ दुखापतही झाली असून त्यांना म्हैसूर येथील जेएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.