PM Narendra Modi यांचा होणार पहिला आंतरराष्ट्रीय पॉडकास्ट; मुलाखत घेणारे कोण आहेत लेक्स फ्रीडमन?

73
PM Narendra Modi यांचा होणार पहिला आंतरराष्ट्रीय पॉडकास्ट; मुलाखत घेणारे कोण आहेत लेक्स फ्रीडमन?
PM Narendra Modi यांचा होणार पहिला आंतरराष्ट्रीय पॉडकास्ट; मुलाखत घेणारे कोण आहेत लेक्स फ्रीडमन?
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखत विशेष गाजली. पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच पॉडकास्ट (podcast) होते. मात्र, आता पंतप्रधान मोदी आणखी एका पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर देखील आहे. मोदी लेक्स फ्रीडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत. (PM Narendra Modi)
निखिल कामथ (Nikhil Kamath Co-founder of Zerodha) आणि पंतप्रधान मोदींचा पॉडकास्टची विशेष चर्चा झाली. पहिल्या पॉडकास्टमध्ये (podcast) पंतप्रधान मोदींनी भारताची प्रगती, जीवन, राजकीय आयुष्यातील घटना अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. आता मोदी लेक्स फ्रीडमन (Lex Friedman) यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरीस प्रेक्षकांना हा पॉडकास्ट पाहता येणार आहे. लेक्स फ्रीडमन यांनी या पॉडकास्टची घोषणा करताना लिहिले की, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi International Podcast) यांच्यासोबत पॉडकास्ट करणार आहे. मी यापूर्वी भारतात कधीही आलेलो नाही. त्यामुळे या प्रवासासाठी, येथील विविधता, ऐतिहासिक संस्कृती आणि अद्भुत लोकांना भेटण्यास व जाणून घेण्यास उत्सुक आहे.

(हेही वाचा – Rani Baug मध्ये येत्या ३१ जानेवारीपासून तीन दिवस ‘पुष्पोत्सव’)

कोण आहेत लेक्स फ्रिडमन? 

फ्रीडमन अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टर आहेत. लेक्स फ्रीडमन 2018 पासून पॉडकास्ट करत आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील (विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि राजकारण) अनेक नामवंत व्यक्तींसोबत पॉडकास्ट केले आहेत. यामध्ये इलॉन मस्क (Elon Musk), जेफ बेझोस, डोनाल्ड ट्रम्प, मार्क झुकेरबर्ग आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की इत्यादींचा समावेश आहे. फ्रीडमनचे YouTube चॅनेलवर 4.5 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.