पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवार १३ नोव्हेंबर रोजी बिहारमधील दरभंगा (PM Narendra Modi Bihar Darbhanga) येथे पोहोचले आणि त्यांनी राज्याला 12,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या योजना भेट दिल्या आहेत. यावेळी त्यांनी दरभंगा येथे बांधल्या जाणाऱ्या बिहारच्या दुसऱ्या एम्सची पायाभरणीही केली. (PM Narendra Modi)
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) उपस्थित होते. पंतप्रधान मोदी बुधवारी दरभंगा येथे पोहोचले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले, पायाभरणी केली आणि 12,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्राला समर्पित केले. दरभंगा एम्स पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पाटण्यानंतर बिहारला मिळालेले हे दुसरे एम्स आहे.
याच क्रमाने पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये सुमारे 5,070 कोटी रुपये खर्चाच्या अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी NH-327E च्या चार लेनच्या गलगलिया-अररिया विभागाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही केली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी 1740 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. झांझारपूर-लौकाहा बाजार (Zanzarpur-Laukaha Bazar) सेक्शनमध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
(हेही वाचा – Manipur मध्ये निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात)
या दरम्यान त्यांनी बिहारमधील चिरालापोथू ते बाघा बिशूनपूरपर्यंत 220 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींनी 1520 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये झांझारपूर-लौकाहा बाजार रेल्वे विभागाचे गेज परिवर्तन, दरभंगा बायपास रेल्वे मार्गाचा समावेश आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community