- प्रतिनिधी
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण राम शिंदे यांनी पंतप्रधानांना दिले.
(हेही वाचा – Aditya Thackeray यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मांडल्या विविध मागण्या)
सभापती राम शिंदे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महासचिव विनोद तावडे यांची भेट घेतली. राम शिंदे यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. यापूर्वी राष्ट्रपती आले होते. आता पंतप्रधानही येतील अशी आशा असल्याचे राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा – Sovereign Gold Scheme : केंद्र सरकार सोव्हरिन गोल्ड फंड बंद करणार? सध्याच्या गुंतवणूकदारांचं काय होणार?)
राम शिंदे यांचे कुटुंब पहिल्यांदाच दिल्लीत आले होते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या कुटुंबाला भेट देणे आणि आईसोबत मराठीतून संवाद साधणे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‘काय सुरू आहे’, असे मोदी यांनी आईला मराठीतून विचारले. पंतप्रधानांनी 20-25 मिनिटे चर्चा केली, असे शिंदे यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community