पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान; काँग्रेसने व्यक्त केला संताप

145

प्रत्येक देशाला त्यांच्या पंतप्रधान, राष्ट्रध्यक्षांचा अभिमान असतो. मात्र एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे विरोधक देखील संताप व्यक्त करताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती देत या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. एकीकडे कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. तर दूसरीकडे हा वाद कायम असताना आता दूसरीकडे अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या प्रकारानंतर काँग्रेसने हा फोटो ट्विट करत अरब देशातील या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी ट्वीटरवर एक फोटो ट्वीट करून त्यासह संताप व्यक्त करणारा मजकूर देखील लिहीला आहे.

(हेही वाचा – Salary Hike: खुशखबर! यंदा खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार १०% वाढ)

काय केले काँग्रेसने ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करू. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो दिसणं कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी, असे ट्विट सुरेंद्र राजपूत यांनी केले आहे.

दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.