नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections 2025) आम आदमी पक्षासह काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला आहे. दरम्यान, शनिवार, 08 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीतल्या निवडणुकीत काँग्रेसने शून्याची हॅटट्रीक लावली आहे. देशाच्या राजधानीत सर्वात जुन्या पक्षाचा सलग सहावेळा पराभव झाला आहे. त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. त्याचवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला घेरले असून, काँग्रेसने शहरी नक्षलवादाला (Urban Naxalism) खतपाणी घातल असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. (PM Narendra Modi)
काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाचा – पंतप्रधान मोदींचा आरोप
काँग्रेस म्हणजे बरबादी, कारण काँग्रेस म्हणजे तो पक्ष उरलेला नाही जो स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आणि त्यानंतरची काही दशकं होता. आज काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवादाचं राजकारण करतो आहे. काँग्रेस नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा ही नक्षल्यांच्या तोंडी असलेली भाषा आहे. आप पक्ष हा काँग्रेसचा शहरी नक्षलवादाचा अजेंडा पुढे चालवत आहे. असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसमध्ये आता शहरी नक्षल्यांचा डीएनए आहे. त्यामुळे काँग्रेस पावला पावलावर बरबाद होते आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
(हेही वाचा – अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांचा फटका; ॲड. Ashish Shelar यांची कडाडून टीका)
काँग्रेस पक्ष सोबत असलेल्यांना बुडवतो
काँग्रेस पक्ष जो सोबत असेल त्याला बुडवतो. काँग्रेसने आपल्या साथीदारांनाही बुडवले आहे. आजची काँग्रेस आपली भाषा आणि आपला अजेंडा चोरण्यात व्यस्त आहे. काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांकडून मुद्दे चोरते आणि नंतर त्यांच्याच व्होटबँकेला रोखते,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांनी हिंदुत्व सोडल्याची काही उदाहरणे!)
दिल्लीत इंडि आघाडी काँग्रेसच्या विरोधात
“आता काँग्रेसची नजर राज्यांतील पक्षांवर आहे. इंडि आघाडीच्या (India Alliance) पक्षांना आता काँग्रेसचे चरित्र कळू लागले आहे. ज्या व्होटबँकमधून (Votebank) ते जिंकत आहेत ती काँग्रेस परत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मित्रपक्षांना समजू लागले आहे. दिल्लीतही हे दिसून आले आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात इंडि आघाडीने निवडणूक लढवली होती. काँग्रेसला रोखण्यात ते यशस्वी झाले, पण आप पक्षाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. आजची काँग्रेस ही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात होती तशी राहिलेली नाही,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community