राज्यात ‘पीएम श्री’ योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले. त्यानुसार, छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा, तर जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाख आणि सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा सादर करण्यात आला.
त्याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी १ हजार कोटी निधीस मान्यता देण्यात आली.जवळपास ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
( हेही वाचा: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; या महिन्याअखेरीस… )
महत्त्वाचे निर्णय असे…
• डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार
• महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत
• पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
राज्यपालांचे अभिनंदन
कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अभिनंदन केले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
Join Our WhatsApp Community