PM Narendra Modi महाराष्ट्र दौऱ्यावर, असे आहे कार्यक्रमांचे नियोजन

72
PM Narendra Modi महाराष्ट्र दौऱ्यावर, असे आहे कार्यक्रमांचे नियोजन
PM Narendra Modi महाराष्ट्र दौऱ्यावर, असे आहे कार्यक्रमांचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या सविस्तर दौऱ्यातील कार्यक्रमांबद्दल जाणून घेऊया. सुरुवातीला ते वाशिमकडे प्रयाण करत सकाळी ११.१५ वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी ११:३० वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी १२ वाजता ते सुमारे २३,३०० कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी ४ वाजता, पंतप्रधान ठाणे येथे ३२,८०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो (Metro) स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो (Metro) ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.

पंतप्रधानांचे ( PM Narendra Modi) वाशिम मधील कार्यक्रम

शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २०,००० कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित करतील. या १८ व्या हप्त्यासह, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे ३.४५ लाख कोटी रुपये असेल. याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे २,००० कोटी रुपयांच्या ५व्या हप्त्याचेही वितरण करतील.

पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत १,९२० कोटी रुपयांचे ७,५०० हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे. पंतप्रधान सुमारे १,३०० कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले ९,२०० शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) राष्ट्राला समर्पित करतील.

( हेही वाचा :  Ratnagiri: तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प कोकणात; रत्नागिरीत होणार २९५५० कोटींची गुंतवणुक

त्याशिवाय, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करतील. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्याकरिता परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे २०० रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहेत. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणे शक्य होणार आहे.

याशिवाय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० (Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 ) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १९ मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्क पंतप्रधानांच्या ( PM Narendra Modi) हस्ते लोकसमर्पित केले जातील. कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.