PM Vishwakarma scheme : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा प्रारंभ

योजनेत १८ पारंपारिक व्यवसायांचा समावेश

159
PM Vishwakarma scheme : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Vishwakarma scheme) यांनी आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी ७४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशातच मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये ‘पीएम-विश्वकर्मा’ या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या योजनेमधून पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, निर्मिती आणि व्याप्ती वाढवणं, त्यांना एमएसएमई मूल्य साखळींमध्ये सामावून घेणं हा या योजनेचा उद्देश आहे.

भारतात कला आणि हस्तकला यांचे विविध प्रकार असून ती प्राचीन आहे आणि मूल्ये आणि श्रद्धा याबाबतीत समृद्ध आहेत. पारंपारिक कारागीर आणि कलाकारांना परंपरेनुसार ‘विश्वकर्मा’ (PM Vishwakarma scheme) म्हणून संबोधले जाते. ते कलात्मक क्षमतेने काम करतात, पारंपरिक साधने आणि तंत्रे वापरुन आपल्या हातांनी वस्तू साकारतात. विश्वकर्मा हे या देशाचे निर्माते आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं 16 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण भारतात ‘पीएम विश्वकर्मा योजना’ नावाची नवीन योजना लागू करायला मान्यता दिली होती. हा पारंपारिक कारागीर आणि कलाकारांसाठी एक दूरदर्शी निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Konkan Ganeshotsav 2023 : आता विमान प्रवासही सिझनल ! ऐन गणेशोत्सवात तिकिटाच्या दरात कैक पटीने वाढ)

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ‘या’ १८ पारंपारिक व्यवसायांचा समावेश

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत (PM Vishwakarma scheme) केंद्र सरकारने १८ पारंपारिक व्यवसायांचा समावेश केला आहे. मासेमारीचे जाळे विणणारे, शिंपी, परीट (धोबी ), फुलांचे हार बनवणारे ,न्हावी , पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, टोपल्या/चटया /झाडू बनवणारे / काथ्यापासून वस्तू बनवणारे, कुंभार, चांभार, शिल्पकार, पाथरवट (दगड फोडणारे), कुंभार, सोनार, कुलूप, हातोडी आणि टूलकिट बनवणारे, लोहार, सुतार, होडी बनवणारे इत्यादींचा समावेश आहे. लघुउद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासामध्ये होड्या आणि बनवणाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असून ते आपल्या मासेमारी उद्योगाच्या सुरळीत कामकाजात मोठी भूमिका बजावतात आणि भारतीय सागरी मत्स्यव्यवसायाचा कणा म्हणून काम करतात. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे (PM Vishwakarma scheme) नोडल मंत्रालय आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.