पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल (PM-WANI Wi-Fi) पद्धतीने जोडायचे आहे. मात्र, महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे या प्रयत्नात अडथळे येत आहेत. आता यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार देशभरात 5 कोटी पीएम-वाय-फाय हॉटस्पॉट स्थापित केले जातील. यासाठी सरकारने पीएम-वाणी (PM-WANI Wi-Fi) फ्रेमवर्क मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. यानंतर आता कोणीही आपल्या भागात वैयक्तिक वायफाय हॉटस्पॉट उभारू शकणार आहे.
(हेही वाचा-Central Government: ‘चांद्रयान-४’ मोहिमेसाठी २ हजार १०४ कोटींची तरतूद! मंत्रिमंडळाची मंजुरी)
सध्या देशभरात मोबाइल टॉवर्सच्या माध्यमातून मोबाइल डेटा उपलब्ध करून दिला जात आहे. पण देशातील अनेक भाग असे आहेत जिथे मोबाइल टॉवरच कमी आहेत. यामुळे या भागातील लोकांना मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे मोबाइल कॉलिंग आणि इंटरनेट वापरात अडचणी येत आहेत. पण आता पीएम वाणी वाय-फाय योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक भागात ब्रॉडबँड वाय-फाय हॉटस्पॉट (PM-WANI Wi-Fi) तयार करत आहे. यामुळे मोठ्या भागात परवडणाऱ्या दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. या बदलाचा मोठा परिणाम मोबाइल इंटरनेटच्या जगात दिसेल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे देशभरात लाखो मायक्रो वायफाय हॉटस्पॉट (PM-WANI Wi-Fi) तयार होतील. यामुळे मोबाइल टॉवरपेक्षा ब्रॉडबँडच्या माध्यमातून स्वस्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.
(हेही वाचा-One Nation One Election: ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी)
देशभरात 5 कोटी पीएम-वाय-फाय हॉटस्पॉट स्थापित केले जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणात डिजिटल पद्धतीनं संपूर्ण देश जोडला जाईल. कारण, या पीएम-वाय-फाय हॉटस्पॉट (PM-WANI Wi-Fi) अशा ठिकाणी सर्वात चांगला फायदा होऊ शकतो ज्या ठिकाणी अजूनही इंटरनेट सेवा किंवा कनेक्टिव्हीटीच्या अडचणी येतात. पीएम-वाय-फाय हॉटस्पॉट देशभरात स्थापित झाल्यास ही अडचण दूर होऊ शकते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community