राज्यातील पोलीस बदल्या आणि मनी लाँडरिंग प्रकरणी सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तपास यंत्रणेने पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने पोलीस बदल्यांच्या प्रकरणात देशमुखांचा सहभाग आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. परिणामी त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय असल्याचे पुरावे
पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाला अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय असल्याचे उपलब्ध पुराव्यानुसार दिसून आले. तसेच त्यांनी स्वतः दबाव टाकत पोलीस बदल्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप केला, असे मत न्यायालयाने मांडले.
(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)
बनावट कंपनीद्वारे मिळणाऱ्या पैशाविषयी स्पष्टीकरण नाही
दिल्लीच्या एका पेपर कंपनीकडून देणगी म्हणून देशमुखांच्या मालकीच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या बँक खात्यात १०.४२ कोटी जमा करण्यात आले. त्यातील २.८३ कोटी देशमुख यांच्या खात्यात ते गृहमंत्री असताना जमा झाले होते. बनावट कंपनीद्वारे मिळणाऱ्या पैशाविषयी कोणतेही स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. देशमुख यांचे वय आणि त्यांनी कारागृहात घालवलेला कालावधी याचा देशमुख यांच्या जामीन अर्जविषयी काहीही संबंध नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community