सोनिया गांधींनी पळवून नेलेल्या नेहरूंच्या कागदपत्रांविषयी PMML कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत

पीएमएमएलच्या (PMML) नोंदीनुसार, २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी ही कागदपत्रे पळवून नेली. या कागदपत्रांमध्ये नेहरू आणि जयप्रकाश नारायण, एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, अरुणा असफ अली, विजया लक्ष्मी पंडित आणि जगजीवन यांच्यात झालेले पत्रव्यवहार आहेत.

15

नव्याने स्थापन झालेल्या पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहित खाजगी कागदपत्र उपलब्ध करावीत, जी त्यांनी २००८ मध्ये पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयातून पळवून नेली होती, असे म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्या कार्यालयाने पीएमएमएलच्या पत्राला अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यावर आता पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यावर बैठकीत एकमत झाले आहे.

पीएमएमएल (PMML) गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पीएमएमएलच्या झालेल्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला. पीएमएमएलचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. या बैठकीत सोनिया गांधी यांनी घेतलेली कागदपत्रे परत मागवली पाहिजेत, असा सूर सदस्यांचा होता. तसेच आता याविषयी कायदेशीर मत घेण्याविषयी एकमत झाले, कारण ही कागदपत्रे इंदिरा गांधींनी नेहरूंच्या कागदपत्रांचे वारस म्हणून १९७१ मध्ये दान केली होती. पीएमएमएलच्या (PMML) नोंदीनुसार, २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी ही कागदपत्रे पळवून नेली. या कागदपत्रांमध्ये नेहरू आणि जयप्रकाश नारायण, एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, अरुणा असफ अली, विजया लक्ष्मी पंडित आणि जगजीवन यांच्यात झालेले पत्रव्यवहार आहेत.
या वर्षी १५ जानेवारीला पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र एस मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पीएमएमएल (PMML) सोसायटी आणि कार्यकारी परिषदेची पुनर्रचना करण्यात आली, ज्यांना संस्थेचे अध्यक्षपद आणखी पाच वर्षांसाठी देण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव एस कुमार, निवृत्त लष्करी लेफ्टनंट जनरल झेड सय्यद अता हसनैन, चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि संस्कार भारतीचे वासुदेव कामथ यांच्यासह अनेक नवीन सदस्यांचा यात समावेश होता. नवीन पीएमएमएल (PMML) सोसायटीची पहिली वार्षिक सर्वसाधारण बैठक काही आठवड्यात होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील चर्चेचा पाठपुरावा म्हणून हा विषय त्यानंतरच उपस्थित होण्याची शक्यता आहे. कार्यवाहीची माहिती असलेल्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्या सोबत याविषयी केलेल्या पत्रव्यवहारामुळे आता भविष्यात या प्रकरणी कारवाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.