PMP च्या ताफ्यात 7 मीटरची E बस दाखल!

90

पीएमपीच्या ताफ्यात पहिली 7 मीटर लांबीची ई-बस दाखल झाली आहे. सिंहगडासह बोपदेव घाट आणि मध्यवस्तीतील अरुंद रस्त्यावर चाचणी करण्यात येणार आहे. अरुंद घाट रस्त्यांवर प्रवासी सेवा पुरविण्यासाठी पीएमपीने 7 मीटर लांबीच्या 300 छोट्या ई-बस खरेदीचे नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने या खरेदी करणार आहे.

महिनाभरातच ई-बस सेवा बंद 

पीएमपी प्रशासन आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे सिंहगडावर ई-बस सेवा सुरू केली होती. मात्र, महिनाभरातच ही सेवा बंद करावी लागली. पीएमपीने येथे 9 मीटर लांबीच्या 12 ई-बसद्वारे प्रवासी सेवा पुरविण्यास सुरुवात केली होती. मात्र, घाट रस्त्यांवरील अरुंद वळणांवर बस वळवण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यातच सिंहगड घाट रस्त्यावरील तीव्र उतारावरील एका वळणावर ई-बसचा अपघात झाला.

(हेही वाचा – शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)

…म्हणून घेतला लांबी कमी करण्याचा निर्णय

सुदैवाने कठड्यामुळे बस प्रवाशांसह बचावली. मात्र, घटनेची दखल घेत प्रशासनाने 9 ऐवजी 7 मीटर लांबीच्या नव्या 300 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या बस पीएमपी महापालिकेच्या साह्याने खरेदी करणार असून, 300 पैकी 1 बस नुकतीच दाखल झाली आहे. आता ही चाचणी यशस्वी झाल्यावर उर्वरित बस दाखल होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.