POK भारताचा भाग; १३० कोटींचा देश कोणाच्या भीतीने हक्क सोडणार नाही; Amit Shah यांनी सुनावले

220

पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगत आहेत. पीओकेची मागणी करत नाहीत. मला त्यांना विचारायचे आहे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश कोणाच्या तरी भीतीने आपले हक्क सोडणार का? राहुल गांधींनी पाकिस्तानच्या सन्मानाबद्दल बोलून त्यांच्या पक्षाच्या लोकांना काय म्हणायचे आहे ते सांगावे? असा सवाल केला. पीओके (POK) हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एएनआयला मुलाखत दिली.

(हेही वाचा Narendra Modi : नकली सेनेने राहुल गांधींना सावरकरांविषयी चार शब्द बोलायला लावावे; पंतप्रधान मोदींचे आव्हान)

राहुल गांधी दोन ठिकाणी लढवतात हे का लपवले? 

अमित शाह (Amit Shah) यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेबद्दल आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराविषयी विचारण्यात आले. यावेळी अमित शाह म्हणाले, सध्या अरविंद केजरीवाल दुसऱ्या प्रकरणात अडकले आहेत, स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणातून मुक्त होऊ द्या. बघूया काय होते ते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल अमित शाह म्हणाले, कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो, पण राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच सांगायला हवे होते की, ते दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते लपवणे योग्य नाही असे मला वाटते. त्यांनी वायनाडच्या लोकांना त्याबद्दल सांगायला हवे होते, जेव्हा तुम्ही मतदानोत्तर सर्वेक्षणात धोका पाहता आणि मग तुम्ही रायबरलीला येता, हे मला योग्य वाटत नाही, असेही अमित शाह म्हणाले. (POK)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.