ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन
दोन दिवसांपूर्वी (v) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० अंतर्गत महत्वाचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये संसदेने जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला. या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल, पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) जनतेवर काय परिणाम होईल, हे मुद्दे समजून घ्यावे लागतील. पाकिस्तानमध्ये सध्या सरकार नाही. तिथे सरकार काळजीवाहू आहे.
त्यामुळे पाकिस्तान याविषयावर फारसे बोलायला तयार नाही. तिथे निवडणूक असल्याने पाकिस्तानातील जे राजकीय पक्ष आहेत, ते वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने यावर फारसे मत मांडले नाही. सध्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे. त्यामुळे या विषयावर पाकिस्तानचे सरकार आणि तेथील राजकीय पक्ष यांची भूमिका आपल्याला माहित नाही. सध्या पाकिस्तानात हिंसाचार इतका वाढला आहे कि बलुचिस्तान वेगळ्या भूमिकेत आहे. पाकिस्तानातील विविध भागांमध्ये नेमके काय घडत आहे, हे कळणे इतके सोपे नाही. कारण तिथे कोणतीही प्रसारमाध्यमे जाऊ शकत नाहीत.
पाकव्याप्त काश्मिरातील जनतेला भारताचे आकर्षण
पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारतात येण्यास तयार आहे का, यावर विचार करायचा झाल्यास पाकव्याप्त काश्मीरमध्ये फारशी प्रगती होत नाही. तिथे गरिबी आहे. मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामानाने भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये खूपच प्रगती होत आहे. पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे याविषयी बोलत असतात. एवढे मात्र नक्की आहे की, पाकव्याप्त काश्मिरातील (PoK) जनतेला भारताचे आकर्षण वाटत आहे. कारण जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती ही पाकव्याप्त काश्मीरपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.
पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला स्वतः उठाव करूनच भारतात यावे लागेल
भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेसाठी जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत काही जागा राखून ठेवल्या आहेत, त्याचा तेथील जनतेवर काय परिणाम होईल याचा विचार केला तर भारताला कधी तरी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होईल, अशी अपेक्षा असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेत काही जागा राखुन ठेवल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकसंख्या ही ४०-५० लाख आहे. तेथील जनता स्वतःहून भारतात येईल का, तर याचे उत्तर नाही आहे. कारण तिथे पाकिस्तानचे सैन्य त्यांना पाकिस्तानपासून कधीही वेगळे होऊ देणार नाही. जर त्यांना भारतात यायचे असेल तर त्यांना स्वतःहून उठाव करावा लागणार आहे. आणि मग त्यांना भारतात यावे लागले आणि ती परिस्थितीत सध्या तरी दिसत नाही.
कारण पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अराजकता जरूर माजली आहे; परंतु पाकिस्तानच्या कुठल्याही भागात जनतेने उठाव करून भारतामध्ये सामील व्हावे, अशी शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे. परंतु भारताच्या संसदेत जे नवीन विधेयक मांडले आहे, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा पाकिस्तान सरकारवर काय परिणाम होईल हा मुद्दा विचारात घेतला तर पाकिस्तान सरकार सध्या ज्या प्रकारे पाकव्याप्त काश्मीरची काळजी घ्यायला पाहिजे तशी घेत नाही. पाकिस्तानात निवडणूक असल्याने गोंधळ माजलेला आहे, तिथे अर्थव्यवस्था खराब झाली आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ज्यावेळी पाकिस्तानची अवस्था खराब असेल त्यावेळी तेथील सरकार पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेची काळजी घेईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.
…तर पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या प्रति आकर्षण वाढेल
पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) जनतेसाठी काही जागा आरक्षित केल्यामुळे तेथील जनतेचे भारताप्रती आकर्षण वाढेल का, अशीही आशा वाटत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला त्यांच्यासाठी किती जागा राखून ठेवल्या आहेत हे महत्वाचे नाही. पण जेव्हा त्यांना समजेल कि भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. ही अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरची प्रगतीही वेगाने होत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये २ कोटीहून अधिक पर्यटक आले होते, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कुणीही जात नाही. या सगळ्या मुद्द्यांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताच्या प्रति आकर्षण निर्माण होईल.
Join Our WhatsApp Community