POK : पाकव्याप्त काश्मीर रिकामे करा; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक 

176
POK : पाकव्याप्त काश्मीर रिकामे करा; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक 
POK : पाकव्याप्त काश्मीर रिकामे करा; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक 

पाकिस्तान हा नेहमीच  भारताविरुद्ध निराधार आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करण्यासाठी या व्यासपिठाचा गैरवापर करत आला आहे. (POK) संयुक्त राष्ट्रातील सदस्य राष्ट्रे आणि इतर बहुपक्षीय संघटनांना हे चांगलेच ठाऊक आहे की, मानवी हक्कांविषयी पाकिस्तानचे  रेकॉर्ड  खराब असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तान हे करतो. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याचा आम्ही पुनरुच्चार करतो. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही, असे खडे बोल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या (UNGA च्या) दुसऱ्या समितीसाठी प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुनावले. त्या  न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या (UNGA) 78 व्या सत्राला संबोधित करत होत्या.  पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने ही सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. (POK)

(हेही वाचा – ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी)

पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे स्पष्ट प्रतिपादन 

या वेळी पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानलाच नाही, तर संपूर्ण जगाला सांगितले आहे. पेटल गहलोत पुढे म्हणाल्या की, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. जगातील सर्वात वाईट मानवी हक्कांचा रेकॉर्ड असलेला देश म्हणून, विशेषत: जेव्हा अल्पसंख्यांक आणि महिलांच्या हक्कांचा विचार केला जातो, तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या व्यक्तीकडे बोट दाखवण्यापूर्वी पाकिस्तानने आपले घर व्यवस्थित केले पाहिजे. लोकशाही आवश्यक आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील सरकारी हिंसाचाराचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये पाकिस्तानातील फैसलाबाद जिल्ह्यातील जरनवाला येथे अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायावर मोठ्या प्रमाणात केलेली क्रूरता ! तिथे एकूण 19 चर्च जाळण्यात आल्या आणि 89 ख्रिस्ती घरे जाळण्यात आली. ज्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्यात आली, अशा अहमदिया लोकांनाही अशीच वागणूक देण्यात आली आहे.” (POK)

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायातील अंदाजे 1000 महिलांना दरवर्षी अपहरण आणि जबरदस्तीने धार्मिक धर्मांतर व जबरदस्तीने विवाहाचे बळी बनवले जाते. भारताने म्हटले की, पाकिस्तान हा दहशतवादी संघटना आणि व्यक्तींचे आश्रयस्थान आणि संरक्षक आहे.  (POK)

पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामा करावा !

पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारताने म्हटले की, त्यांनी पीओके रिकामा करावा आणि तांत्रिक गोंधळात अडकण्यापेक्षा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर विश्वासार्ह कारवाई करावी.  त्या हल्ल्याचे बळी 15 वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सीमापार दहशतवाद रोखा आणि दहशतवादाच्या पायाभूत सुविधा त्वरित बंद करणे, बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने बळकावलेले भारतीय भूभाग रिकामा करणे, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील गंभीर आणि सतत मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवणे, ही तीन पावले उचलावी लागतील, असे भारताने म्हटले आहे. (POK)

काय म्हणाले होते पाकिस्तानी पंतप्रधान…

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकार यांनी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना कोणताही भेदभाव न करता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची गरज व्यक्त केली. यूएनच्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हिंदुत्वाबाबत बरीच विधाने केली होती. जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या या हिंदुत्ववादी राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेले आहे, असे काकर म्हणाले. निज्जर यांची कॅनडात झालेली हत्या हा हिंदुत्वाच्या विस्तारवादी राजकारणाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. (POK)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.