मनसे नेते संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक, चौघे ताब्यात

169
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि किसन सोलंकी या दोघांना अटक केली आहे. या दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान या हल्ल्यासंदर्भात आणखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. देशपांडे यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की, व्यवसायिक वादातून झाला याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी अशोक खरात हा महाराष्ट्र् राज्य माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून किसन सोलंकी हा एक भांडुप परिसरात राहणारा असून शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे समजते. हा प्रकरण मुंबई गुन्हे शाखकडे वर्ग करण्यात आलेले असून गुन्हे शाखा कक्ष ५ कडून या गुन्ह्याचा संपूर्ण तपास केला जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादर शिवाजी पार्क परिसरात चार जणांनी
बॅट आणि स्टॅम्पने हल्ला करून पळ काढला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे हे जखमी झाले असून त्यांच्या उजवा हाताला गंभीर दुखापत झालेली असून पायांना देखील मुका मार लागला आहे. या हल्ल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, धमकी देणे सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती, हल्ला करणारे हल्ला करतेवेळी ठाकरेंना नडतोस,वरुन ला नडतोस, पत्र लिहतोस असे बोलून हल्ला करीत होते असे देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे ८ पथके तयार करण्यात आली, तसेच गुन्हे शाखेचे ४ पथके हल्लेखोरांचा शोध घेत होती. दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून दोन हल्लेखोरांची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले व शनिवारी पहाटे गुन्हे शाखेने भांडुप परिसरातून किसन सोलंकी आणि अशोक खरात या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली, या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
अशोक खरात हा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष असल्याचे समोर आले असून सोलंकी हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचे समजते. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना अटक करण्यात आलेली नाही, त्यांचा या हल्ल्यात काय भूमिका होती हे तपासले जात आहे.अटक करण्यात आलेल्या दोघाना लवकरच किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असून या दोघांची पोलीस कोठडीची मागणी केली
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.