राणा दाम्पत्यांच्या घरासमोर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक

81

मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे वाचन करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईतील त्यांच्या खार येथील घरामध्ये थांबले होते, तेव्हा मात्र शिवसैनिकांनी त्याठिकाणी गोंधळ घातला. या प्रकरणी राणा दाम्पत्यांना अटक केली आहे, तसेच ६ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

अन्य शिवसैनिकांचा शोध सुरु 

मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली असून इतर कार्यकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते, त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे खार येथील निवासस्थान गाठले होते आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दिवसभर शिवसैनिकांनी या परिसरात गोंधळ घालून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी याच प्रकरणात राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस घेत होते. याप्रकरणी आता ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच इतरांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.