मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे काही तासातच सभा होणार आहे. त्याआधीच पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी राज्यभरातून धरपकड सुरु केली आहे. त्याची सुरुवात मुंबईतून झाली आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यास विरोध
राज ठाकरे यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भीम आर्मीचे अशोक कांबळे सभेच्या आधी रविवारी दुपारी औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याचवेळी मुंबई पोलिसांनी अशोक कांबळे यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतले. तर वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादमधील माजी जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र आम्ही मनसेला एकाही मशिदीवरील भोंगा उतरवून देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे हे आव्हान आहे, असे अमित भुईगळ यांनी म्हटले. राज ठाकरेंच्या सभेवर नजर ठेवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. यासाठी सभास्थळी १ हजार ७०० पोलिसांचा फौजफाटा सभास्थळी उभा करण्यात आला आहे.
(हेही वाचा पंजाबमध्ये देशातील पहिल्या मुस्लिमबहुल मलेरकोटला जिल्ह्यात फडकला खलिस्तानी झेंडा)
Join Our WhatsApp Community