इराणी व नायजेरियन वस्त्यांमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची माहिती

56
इराणी व नायजेरियन वस्त्यांमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची माहिती
  • प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्ती तसेच राज्यातील नायजेरियन वस्त्यांमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी विधान परिषदेत दिली. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्कासह कठोर कारवाई होणार असून महिलांचाही वापर गुन्हेगारीसाठी झाल्यास त्यांच्यावरही मोक्का लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंबिवली येथील इराणी वस्तीत आठ-दहा पिढ्यांपासून इराणी समाज राहतो. येथे सुमारे दोन हजार इराणी असून, त्यांनी पोलिसांवर पाच वेळा प्राणघातक हल्ले केले आहेत. महिलाही गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलिसांवर हल्ला करतात, अशी माहिती भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हे गुन्हे न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. तसेच नायजेरियन वस्त्यांमधून ड्रग्जचा धंदा वाढत असल्याची भीती अनिल परब यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – “त्यावेळी जे बोललो ते योग्य होते”; जुन्या व्हिडिओचे DCM Ajit Pawar यांच्याकडून समर्थन)

गृहराज्यमंत्री कदम (Yogesh Kadam) म्हणाले, “इराणी व नायजेरियन वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. आंबिवलीतील वस्तीमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाईल. महिलांनी गुन्हेगारांना पळवून लावल्यास त्यांच्यावरही मोक्काची कारवाई केली जाईल.” त्यांनी स्पष्ट केले की, लहान मुलांनाही गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

“मीरा रोड, भाईंदर भागातून इराणी व नायजेरियन गुन्हेगारांना हुसकावून लावले आहे. नवी मुंबई आणि रायगड परिसरात ते आश्रय घेत आहेत. अनधिकृत बांधकामातून जर ते गुन्हेगारी करत असतील, तर अशा बांधकामांवर बुलडोझर चालवला जाईल,” असा इशारा गृहराज्यमंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी दिला. “मुंबई पोलीस जगप्रसिद्ध आहेत. परराज्यातील गुंड मुंबईत येऊन लपले तरी शोधमोहीम राबवून त्यांचे उच्चाटन केले जाईल,” अशी ग्वाहीही गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.