शनिवारी मध्यरात्री शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदुक काढून गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात येत आहे. पण या सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचे या फुटेजमध्ये दिसत नसल्याची माहिती मिळत आहे.
सीसीटीव्हीमध्ये केवळ गर्दी
सदा सरवणकर यांनी या हाणामारीच्या वेळी आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. पण सरवणकर यांनी मात्र आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यांना सरवणकर यांनी गोळीबार केल्याचे फुटेज सापडलेले नाही. घटनास्थळी अंधार असल्याने सीसीटीव्ही मध्ये केवळ गर्दीच दिसत आहे. त्यामुळे यावरुन सरवणकर यांनी गोळीबार केल्याचे स्पष्ट होत नसल्याने पोलिस अद्याप कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘आता ठाकरे गटातील उरलेल्या गाळाला चांगले दिवस आले आहेत’, राणेंचा टोला)
दरम्यान, पोलिसांकडून सरवणकर यांचे पिस्तुल जप्त करण्यात आले असून या पिस्तुलाचे रेकॉर्ड नजिकच्या पोलिस स्थानकातून तपासण्यात येणार आहेत.यावरुन सदा सरवणकर यांच्याकडे असलेली पिस्तुल आणि काडतुसे यांबाबतची माहिती मिळणे शक्य होणार आहे. त्यावरुन पोलिस माहिती घेणार आहेत.
Join Our WhatsApp Community