शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक हे सध्या बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत आले आहेत. सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच पीडित मुलीला कुचिक यांच्याकडून धमकावले जात असल्याचा आरोपही वाघ यांनी केला आहे. वाघ यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुचिक यांच्या मुलीने ही तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहेत मुलीचे आरोप?
चित्रा वाघ आणि पीडित मुलगी या दोघी संगनमताने कुचिक यांची बदनामी करत आहेत, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश आहेत. कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
(हेही वाचा आता ‘आप’चे लक्ष्य नऊ राज्ये!)
शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार
काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण लागले असल्याचे समोर आले आहे. तर चित्रा वाघ या पोलिसांवर खोटे आरोप करत आहे, असे म्हणत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वाघ यांच्यावर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community