संदीप देशपांडेंवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

134
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे मनसेच्या दोन्ही नेत्यांना पोलीस अटक करतील. या गुन्ह्याच्या अंतर्गत किमान २ वर्षांची कारावासाची शिक्षा आहे. या प्रकरणात केवळ न्यायालयच जामीन देऊ शकते.

पोलीस घेत आहेत शोध

संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि वाहन चालक यांच्या विरोधात भादंवी ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे), २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३३६ (निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापतीस कारणीभूत) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून साक्षीदार म्हणून जखमी महिला कॉन्स्टेबल आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोधासाठी परिमंडळ ५ मधील विविध पोलीस ठाण्यातील गुन्हा प्रकटीकरण पथकातील अधिकारी तसेच पथक शोध घेत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देऊन निसटले. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडेंच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा होती. त्यातच आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.