काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा प्राचार्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संतोष बांगरांनी या व्हिडिओ मागचं सत्य सांगितलं होत. मारहाण केलेल्या प्राचार्यांनी एका महिलेवर अन्याय केला होता. म्हणून त्यांनी त्या प्राचार्यांला माराहण केल्याचं सांगितलं होत. पण आता हेच मारहाण प्रकरण बांगरांच्या अंगाशी आलं आहे. प्राचार्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष बांगरांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर शनिवारी, २८ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आली माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयीतील मारहाण केलेल्या प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय बांगरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्राचार्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, महाविद्यालयाच्या पाच अधिव्याख्याता यांनी प्राचार्य उपाध्याय विनाकारण त्रास देतात आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत बैठका घेतात. यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास होतो, असं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं होत. यामुळे आमदार बांगर, शंकर बांगर आणि ३० ते ४० कार्यकर्त्यांसह पाच अधिव्याख्यांत कक्षात आले. आणि प्राचार्य उपाध्याय यांच्यासह साक्षीदारास शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. तसंच प्राचार्य कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केली आणि यामुळे पाच हजाराचं नुकसान झालं आहे.
प्राचार्य अशोक उपाध्याय यांच्या तक्रारवरून आमदार संतोष बांगरासह ४० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसंच याप्रकरणाचा तपास फौजदार मगन पवार तपास करत आहेत.
(हेही वाचा – यामुळे प्राचार्यांना केली मारहाण; व्हायरल व्हिडिओबाबत बांगरांनी दिलं स्पष्टीकरण)
Join Our WhatsApp Community