Kunal Kamra ला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स !

Kunal Kamra ला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स !

91
Kunal Kamra ला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स !
Kunal Kamra ला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स !

वादग्रस्त विनोदवीर कुणाल कामरा (Kunal Kamra) याला मुंबई पोलिसांनी तिसरे समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून कुणाल तामिळनाडूला निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुंबईच्या घरी नोटीस बजावली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या वानूर येथील कोर्टाने कामराला अटकपूर्व ट्रांझिट जामीन मंजूर केला आहे. (Kunal Kamra)

हेही वाचा-मंत्री Nitesh Rane यांची हिंदुत्वाच्या मुद्यावरून राऊतांवर टीका; म्हणाले, तुम्ही गोधडी..तेव्हा देवेंद्र फडणवीस…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला तिसरे समन्स बजावले. या प्रकरणी खार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला समन्स बजावत 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण, तो एकदाही उपस्थित राहिलेला नाही. (Kunal Kamra)

हेही वाचा- Medicine Price Hike : नव्या वर्षात ९०० हून अधिक औषधे महागली ; पेन किलर्स व अ‍ॅन्टीबायोटिक्सच्या किंमतीत वाढ

कुणाल कामरा याला तामिळनाडूच्या वानूर येथील न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मंजूर केला. यापूर्वी मद्रास हायकोर्टाने कुणाल याला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यांला औपचारिकपणे जामीन मिळवण्यासाठी वानूर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर, वानूर न्यायालयातून त्याला पुन्हा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कुणाल कामराने आणखी एक नवीन पोस्ट करत सरकारवर दडपशाहीचा आरोप केला आहे. (Kunal Kamra)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.