रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी

त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामंध्ये मोर्चे काढून नंतर दंगली घडवून आणल्या. या प्रकरणी रझा अकादमीवर आरोप होत आहे. या संस्थेवर बंदीची मागणी वाढू लागली आहे. याकरता आता पोलिसांवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी मालेगाव तेथील रझा अकादमीच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री भल्या पहाटे ३.३० वा. छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांनी काही पत्रके आणि कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.

रात्री २ वाजता केली छापेमारी 

जिल्ह्याचे पोलिस उपाधीक्षक धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री २ तास ही छापेमारी सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी अनेक दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. रझा अकादमीने ‘मालेगाव बंद’ ची हाक दिली होती. त्यावेळी मोठा हिंसाचार झाला होता. दगडफेक आणि जाळपोळ केली होती. तेव्हा पोलिसही जखमी झाले होते. या प्रकरणी रझा अकादमी ही रडारवर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे. त्यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. तसेच रझा अकादमीच्या ४ नेत्यांवरही गुन्हे दाखल केले असून ते मात्र सध्या फरार आहेत. सुमारे अडीच हजार दंगलखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

मध्यरात्री शहरातील इस्लामपुरा भागातील रझा अॅकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर  छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु आहे.
– चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधिक्षक.

कागदपत्रे ताब्यात घेतली 

रझा अकादमीने मालेगावसह, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, सातारा या भागात हिंसक आंदोलने केली होती. या प्रकरणी आता रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे पोलिसही आता या हिंसाचारात रझा अकादमीचा सहभाग होता का, याची पडताळणी करत आहेत. त्या अनुषंगानेच मालेगावमधील रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी केली असल्याचे सूत्रांकडून समजते.

(हेही वाचा : …खरंच बाळासाहेब २४ कॅरेट सोनं होते‍!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here