Police Recruitment: ‘या’ जिल्ह्यात मैदानी चाचणीची प्रक्रिया स्थगित, जाणून घ्या कारण…

110
Police Recruitment: 'या' जिल्ह्यात मैदानी चाचणीची प्रक्रिया स्थगित, जाणून घ्या कारण...

नांदेड येथे गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पोलीस कवायत (Police Recruitment) मोठ्या प्रमाणात मैदानावर चिखल साचला. त्यामुळे शुक्रवारी, २१ जूनला होणारी पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित केल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस दलाने दिली.

नांदेड जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली. नांदेड येथे १३४ जागांसाठी भरती प्रक्रिया गुरुवारपर्यंत सुरु होती. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शुक्रवारी, (२१ जून) मैदानावर चिखल साचचल्याचे चित्र होते. नांदेड पोलीस प्रशासनाने मैदानाची पाहणी केली. त्यानंतर आजची भरती प्रक्रिया स्थगित केली. नांदेड पोलीस प्रशासनाने त्याबाबत सूचना फलकावर त्याची माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये गुरुवारी होणारी उमेदवारांची शारीरिक चाचणी पोलीस परेड मैदानावर पाणी साचल्याने व पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांना पुढील तारीख त्यांचे ईमेल आयडीवर कळविण्यात येईल असे नमूद करण्यात आले हाेते.

(हेही वाचा – Eknath Khadse यांनी रक्षा खडसेंसह घेतली अमित शहा यांची भेट, मोठी जबाबदारी मिळणार? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा)

शुक्रवारी दिनांक 21.06.2024 रोजी होणारी उमेदवारांची शारीरिक चाचणी पोलीस परेड मैदानावर पाणी साचल्याने व पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आलेली आहे.संबंधित उमेदवारांना पुढील तारीख त्यांचे ईमेल आयडीवर कळविण्यात येईल, अशी माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस भरती स्थगित
अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित करण्यात आली आहे. मैदानात पावसामुळे चिखल साचला होता. त्यामुळे पाेलिस दलाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवली. उमेदवारांना पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.