अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या विरोधात राज्यभर विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साध्य पोलीस तिला घेऊन विविध ठिकाणी फिरत आहेत. तिला तिच्या नवी मुंबईच्या घरी पोलीस घेऊन आले. तेव्हा पोलिसांनी केतकीचा लॅपटॉप आणि २ मोबाईल जप्त केले आहेत. तिच्याविरोधात १५३ अ सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही केतकी पोलिसांसोबत फिरताना हसत हसत फिरत आहे.
पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले
केतकीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात कलम 500, 505 (2), 501 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती. रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी तिला हजर केले. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही का?, असा सवाल केतकीने उपस्थित केला.
(हेही वाचा शिवसंपर्क नाही, तर शिव्यासंपर्क! फेरीवाल्यांना आणून सभेला बसवलेले! नारायण राणेंचा घणाघात)
Join Our WhatsApp Community