मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत ४ मे रोजी जेथे भोंग्यांवरून अजान वाजवले जाईल, त्या ठिकाणी दुप्पट क्षमतेने भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले, राज्यातील १५ हजार आणि महामुंबईतील १२०० मनसे नेत्यांना नोटीस बजावल्या. मात्र ३ मे रोजी रात्री राज ठाकरे यांनी पत्रक काढून ४ मे रोजी हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केल्यामुळे लगेच पोलिसांनी नोटीस दिलेल्या मनसे नेत्यांची रात्री धरपकड सुरु केली आहे.
राज ठाकरेंनाही होणार अटक
राज ठाकरे यांच्या पत्रामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी लागलीच मनसेच्या नेत्यांना नोटीस दिल्या आहेत. त्या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रात्रभर ही धरपकड सुरु राहणार आहे. ४ मे रोजी मनसेच्या भोंगा आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून पोलिसही सतर्क झाले आहेत. मनसेचे कार्यकर्ते हे लगेच दादर येथील शिवतीर्थ येथे जमायला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस राज ठाकरे यांनाही अटक करू शकतात, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community