काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मोदी यांना मारू शकतो’ असे विधान केल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तर, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. नितीन गडरकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर भाजप नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता असून भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन देखील केलं जाण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचं, नितीन गडकरी म्हणाले आहे. यासह पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. @BJP4India
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 17, 2022
(हेही वाचा -पटोले अडचणीत! मोदींना मारण्याची भाषा भोवली)
फडणवीसांनी फटकारले
तर, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी केले आहे.
पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत.
आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो… https://t.co/JdzCZkrpHi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2022
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले पटोले
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community