काँग्रेस नेते Kamal Nath यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल; कारण…

एआय तंत्रज्ञानाचा व्हिडिओ पूर्णपणे बनावट, पीए ची चौकशी भाजपाचे उमेदवार विवेक बंटी साहू यांची तक्रार

242
कॉँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल; कारण..

कमलनाथ यांचे पीए आरके मिगलानी (PA RK Maglani) यांच्यावर भाजपा उमेदवाराच्या विरोधात व्हिडिओ जारी करण्यासाठी २० लाख रुपयांची डील केल्याचा आरोप करण्यात आला  आहे. तसेच, मध्य प्रदेशचे (Formar CM Kamal Nath) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या शिकारपूर, छिंदवाडा येथील निवासस्थानी पोलिसांचे पथक चौकशीसाठी पोहोचले असून, सध्या पोलिसांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. छिंदवाडा लोकसभा (Chindwada Lok sabha election 2024) मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार विवेक बंटी साहू (Vivek Bandi Sahu) यांच्या तक्रारीवरून पोलीस कमलनाथ यांच्या घरी पोहोचले. कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ छिंदवाडा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहे. (Kamal Nath)

(हेही वाचा – Water Cut : मुंबई शहरातील ‘या’ भागात राहणार १०० टक्के पाणी कपात )

दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न  

बंटी साहू यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी रात्री सुदेश नागवंशी यांनी तक्रार दाखल केली की सचिन गुप्ता, रहिवासी आदित्य धाम, छिंदवाडा आणि कमलनाथ यांचे सहकारी आरके मिगलानी यांनी एआय तंत्रज्ञानाचा बनावट व्हिडिओ बनवला. व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. त्यानंतर एका खासगी वाहिनीच्या मूळ बातमीचा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला. हे खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘माझा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्यासाठी कमलनाथ यांचे पीए आरके मिगलानी यांनी पत्रकारांना २० लाख रुपयांचे आमिष दाखवली होती’ असा आरोप भाजपा  उमेदवार विवेक बंटी साहू यांनी केला. (Kamal Nath)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूत भाजपाला जयललिता यांची पोकळी भरून काढण्याची संधी )

यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी उमेश गोल्हानी म्हणाले की, पोलिसांकडे निवडणुकीच्या काळात तक्रारी येत असतात, त्यामुळे तपास सुरू आहे. पोलीस शिकारपूरला पोहोचताच लोकांची गर्दी जमू लागली. मात्र, पोलिस याला नियमित तपास म्हणत आहेत. काँग्रेसने कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ यांना छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने विवेक बंटी साहू यांच्यावर बाजी मारली आहे. छिंदवाडा हा कमलनाथचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जातो. 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.