‘त्या’ शिवसैनिकांना पोलीस अटक करणार! किरीट सोमय्यांचे ट्वीट

103

किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी गेले होते. यावेळी शिवसेनेचे पुणे अध्यक्ष संजय मोरे आणि काही कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. झटापट झाल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. या शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : शिवसेनेनं मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपचा घाणाघात )

गुन्हा दाखल

पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी “माझ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत.” अशी माहिती ट्वीट करत दिली आहे.

 

( हेही वाचा : लतादीदींचे निधन : दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर! )

नेमके काय घडले…

किरीट सोमय्या हे पुणे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. तर काहींनी त्यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजप नेते उपस्थित करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.