औरंगजेबाच्या थडग्यावरून राजकीय रणकंदन; भाजपा आमदार Atul Bhatkhalkar यांचा विरोधकांना इशारा

39
औरंगजेबाच्या थडग्यावरून राजकीय रणकंदन; भाजपा आमदार Atul Bhatkhalkar यांचा विरोधकांना इशारा
  • प्रतिनिधी

औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत “औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय?” असा सवाल उपस्थित केला. विरोधक केवळ मुस्लिम मतदारांना खूश करण्यासाठी असे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“औरंगजेबाचे थडगे वाचवण्याचा प्रयत्न करू नका” – भातखळकर

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले, “विरोधकांनी इतकी वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचे पाप केले. मात्र, आता हिंदू समाज जागृत झाला आहे. जर विरोधकांनी औरंगजेबाचे थडगे वाचवण्याचा अधिक प्रयत्न केला, तर हिंदू समाज त्या थडग्यात तुम्हालाच पुरल्याशिवाय राहणार नाही!”

(हेही वाचा – Donald Trump : ‘या’ ४१ देशाच्या लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी ; काय आहे ‘ट्रॅव्हल बॅन’ ?)

“छत्रपती संभाजीनगर म्हणायची हिंमत का नाही?” – अंबादास दानवेंवर टीका

शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी हिंदुत्वावर भाष्य करण्यापूर्वी, स्वतःच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी औरंगाबादला ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणायची हिंमत दाखवावी,” असा टोला भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला.

त्यांनी पुढे म्हटले, “शिवसेना उबाठा महानगरपालिकेत प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. हेच प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुले वाहतात. यावर दानवेंनी आधी भूमिका स्पष्ट करावी आणि मग भाजपा्-शिवसेनेवर बोलावे.”

(हेही वाचा – America तब्बल ४१ देशांच्या नागरिकांना करणार प्रवेश बंदी)

“आव्हाडांचा इतिहास विकृतीकरणाचा प्रयत्न”

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत भातखळकर म्हणाले, “आव्हाडांनीच महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला होता की, अफजलखान स्वराज्य विस्तारासाठी आला होता. त्यांनीच अफजलखान नसता तर छत्रपती शिवाजी महाराजही नसते, असे वादग्रस्त विधान केले होते.”

भातखळकर (Atul Bhatkhalkar) पुढे म्हणाले, “असा खोटा इतिहास लोकांनी नाकारला आहे. अफजलखानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही!”

(हेही वाचा – राज्यातील १८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

औरंगजेबाच्या थडग्यावरून हिंदुत्ववादी विरुद्ध विरोधक संघर्ष तीव्र

औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना आक्रमक झाली आहेत, तर शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची भूमिका संमिश्र दिसत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.