विधेयक मागे घ्या; अन्यथा दुसरा एकनाथ शिंदे तयार होण्यात अडचणी – अजित पवार

208
मुख्यमंत्री आमदारांतून निवडता येत असल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना बाजूला करून, ४० आमदारांच्या साथीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा अध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची परवानगी मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दुसऱ्या कुणाला एकनाथ शिंदे होता येणार नाही. त्यामुळे हे विधेयक तत्काळ मागे घ्यावे, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी (सुधारणा) विधेयक २०२२ वर विधानसभेत चर्चा करताना, पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, याआधीही अशा प्रकारचा निर्णय राज्यात झाला होता. पण नगराध्यक्ष एका विचारांचा आणि नगरसेवक दुसऱ्या विचारांचे, अशी स्थिती उद्भवल्यामुळे शहरांचा विकास खुंटला. कारण नगराध्यक्षाने विकासाचा प्रस्ताव मांडला, की इतर पक्षाचे नगरसेवक तो बहुमताच्या जोरावर नामंजूर करतात. त्यामुळे पक्षाचा फायदा पाहून निर्णय न घेता, शहराच्या विकासाच्या दृष्टीने याकडे पहा, असेही अजित पावारांनी सांगितले.

मुख्यमंत्रीही जनतेमधून निवडा

नगराध्यक्षाची थेट निवड केल्यास पैशांचा वापर, दादागिरी, गुंडशाहीचा आधार घेतला जाण्याची शक्यता बळावते. त्यामुळे निमशहरी भागांत धनशक्ती आणि दांडगाईचा उदय होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन हे विधेयक मागे घ्या. ते जमत नसल्यास मुख्यमंत्रीही जनतेमधून निवडण्याचा निर्णय घ्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.