संजय राऊत यांच्याकडून महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ; ऑडिओ क्लीप व्हायरल

91

संजय राऊत यांची 70 सेकंदांची एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी 26 वेळा अत्यंत अश्लील शिव्या दिल्या आहेत. ते एका महिलेशी बोलत आहेत आणि ऑडिओमध्ये तिला फोन बंद करण्याची धमकी दिली जात आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही ऑडिओ क्लिप शिवसेना खासदार संजय राऊत यांची आहे. एकूण 70 सेकंदांचा ऑडिओ असलेली ही क्लिप व्हायरल झाली असून, त्यात महिला आणि राऊत नावाच्या पुरुषाचा संवाद चर्चा आहे. महिला खूप शांत आहे, तर राऊत इतके संतापले आहेत की 70 सेकंदाच्या संभाषणात त्यांनी 26 वेळा शिवीगाळ केली आहे. या क्लिपच्या शेवटी राऊत यांनी महिलेला जमिनीची कागदपत्रे देण्यास सांगितले आहे.

ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर कारवाईची मागणी

ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर कारवाईची मागणी केली जात आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो सत्यतेचा. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ क्लीपमधील आवाज हा खरच राऊंताचा आहे का? हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. वृत्त माध्यमातून, ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे दाद मागितली आहे. या प्रकरणामध्ये जो मूळ मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे हा वाद जमिनीचा आहे आणि तो अनेक दिवसांपासून सुरु आहे. हिंदुस्थान पोस्टने या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.