अंधेरीतील भाजपच्या जोत्स्ना दिघे यांचा शिवसेनेत प्रवेश

145

मागील महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अंधेरी वर्सोवा येथील माजी नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अंधेरी पश्चिम भागातील काँग्रेसच्या तिकीटावर सातत्याने निवडून येणाऱ्या दिघे यांचा सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ६० मधून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु दिघे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात सन २०१७ मध्ये भाजपचे योगिराज दाभाडकर हे विजयी झाले होते. दाभाडकर यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचा ५०२ मतांनी पराभव केला होता. दाभाडकर यांना ६९०८ मते, तर फणसे यांना ६४०६ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या जोत्स्ना दिघे यांना ३४६९ मते मिळाली होती. या पराभवानंतर त्यांनी काही दिवसांनी दिघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता तिथूनही त्यांनी बाहेर पडत अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

( हेही वाचा : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा इशारा )

माजी मंत्री आणि शिवसेना विभागप्रमुख अनिल परब आणि महिला विभाग संघटक माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी यांच्या पुढाकारानंतर दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार शनिवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून दिघे यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. अंधेरी पश्चिम हा काँग्रेसचा गड होता. परंतु अंतर्गत राजकारणामुळे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर हे शिवसेनेत आले असून, सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ६८ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे आंबेरकर यांच्यापाठोपाठ आता दिघेही भाजप व्हाया प्रवास करत शिवसेनेत आल्याने या भागात शिवसेना मजबूत झाल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा त्यांनी जयवंत परब यांच्यासोबतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेत असताना नगरसेवक पद भूषवणाऱ्या दिघे यांनी त्यानंतर काँग्रेसमध्ये ही दोनदा नगरसेवक पद भूषवले होते. त्यामुळे तब्बल १८ ते १९ वर्षांनी त्या शिवसेनेत म्हणजे स्वगृही परतल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.