मढ मार्वे स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण खात्याची नोटीस

माजी मंत्री आणि काॅंग्रसचे नेते अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, अस्लम शेख- मढ मार्वे  येथे 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्टाच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे.

( हेही वाचा: देवेंद्र फडणवीस ‘सागर’सोबत ‘मेघदूत’ बंगल्याचेही कारभारी )

अस्लम शेख यांचा एक हजार रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांचे उल्लंघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती.

किरीट सोमय्यांचे आरोप काय?

अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांचे उल्लंघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हते तिथे 2021 ला स्टुडिओ उभारला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here