“धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार”; शंभुराज देसाईंचा दावा

173

सध्या धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार यावरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळते आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला आहे. याबाबत आयोगाकडून 7 ऑक्टोबरला निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादावर निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गट 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असा दावा केला आहे.

काय म्हणाले शंभुराज देसाई?

धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी केला आहे. नगरसेवक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अगदी सरपंचाचे सुद्धा बहुमत शिंदेसाहेबांकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या नियमावलीनुसार, बहुमताच्यादृष्टीने विचार केल्यास धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.

( हेही वाचा: दीड वर्षाच्या मुलाला राजकारणात ओढून काय साध्य केलंत उद्धव ठाकरे? )

ठाकरे गटाची टीका

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्यावतीने शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार आणि खासदार मूळ पक्ष होत नाही, शिंदे गट डमी, भाजप सूत्रधार असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गट कवच कुंडल काढण्याचा प्रयत्न करत आहे. कवच कुंडल काढणा-यांना जनता धडा शिकवेल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.