Telangana Election 2023 : तेलंगणाच्या निवडणुकीत कुटुंबवादाचा पूर

भाउ-बहिण, नवरा-बायको, काका-पुतणे मैदानात

146
Telangana Election 2023 : तेलंगणाच्या निवडणुकीत कुटुंबवादाचा पूर
Telangana Election 2023 : तेलंगणाच्या निवडणुकीत कुटुंबवादाचा पूर
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाने ‘नेपोटिजम’च्या विरोधात आक्रामक भूमिका घेतली असली तरी तेलंगणातील राजकीय पक्षांवर त्याचा फारसा काही परिणाम झाला असल्याचे अजिबात दिसून येत नाही आहे. तेलंगणातील राजकीय पक्षांनी नेत्यांच्या नातलगांना मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या मैदानात उतरविले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Telangana Election 2023)

सविस्तर वृत्त असे की, तेलंगणा विधानसभेसाठी येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणे आहे. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून प्रत्येक राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. मात्र, तेलंगणात सध्या एका मुद्याची चर्चा खूप जोरात आहे. ती अशी की, येथील राजकीय पक्षांनी नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. जेव्हा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांनी परिवारवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. (Telangana Election 2023)

तसं बघितलं तर, सर्वच राजकीय पक्षांमध्ये हा प्रकार दिसून येतो. परंतु, सत्ताधारी भारत राष्ट्र समिती यात आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दस्तुरखुद्य मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गजवेल आणि कामारेड्डी अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. केसीआरचे चिरंजीव आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव सिरसिला या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्याचे भाचे आणि तेलंगणाचे अर्थ आणि आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी सिद्यीपेटमधून पुन्हा एकदा दंड थोपटले आहे. (Telangana Election 2023)

भारासचे कार्यकारी अध्यक्ष रामाराव यांनी अलिकडेच नेत्यांच्या मुलांना तिकीट देण्याच्या मुद्यावर वक्तव्य दिले होते. ते म्हणाले होते की, ‘डॉक्टर आणि सिने जगतासह विविध व्यवसायात मुलं आपल्या आई-वडिलांच्या व्यवसायात येतात. अशात त्यात काहीही गैर नाही’. काँग्रेसने एकीकडे हुजुरनगर मतदारसंघातून खासदार एन. उत्तमकुमार रेड्डी यांना तिकीट दिली आहे. तर दुसरीकडे, त्यांची पत्नी एन पद्मावती यांना कोडाद या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मयनामपल्लीचे विद्यमान आमदार हनुमंत राव हैदराबादच्या मलकाजगिरीमधून निवडणूक लढत आहेत. तर त्यांचेच चिरंजीव रोहित राव मेदकमधून मैदानात उतरले आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत, हे येथे विशेष. (Telangana Election 2023)

महत्वाचा मुद्या असा की, काँग्रेसच्या तिकीटवर मैदानात उतरलेले हनुमंतराव यांना भारत राष्ट्र समितीने तिकीट देऊ केले होते. परंतु त्यांनी स्वत:साठी आणि मुलालाही तिकीट हवे होते. भारासने यास नकार दिला. काँग्रेसने हीच बाब हेरली आणि बाप-लेकांना तिकीट देण्याची ऑफर दिली. काँग्रेसकडून तिकीट मिळताच हनुमंतराव यांनी केसीआरचा पक्ष सोडला आणि काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. (Telangana Election 2023)

(हेही वाचा – Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी)

काँग्रेसचे अन्य खासदार कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी नलगोंडामधून निवडणूक लढत आहेत. तर दुसरीकडे, त्यांचेच बंधू कोमाटिरेड्डी राजगोपाल रेड्डी मुनुगोडे या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने दोन-दोन भावंडांना सुध्दा उमेदवारी दिली आहे. जी विवेक यांना चेन्नूरमधून तर त्यांचे दुसरे बंधू जी. विनोद यांना बेल्लमपल्लीमधून तिकीट दिली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ‘एक परिवार एक तिकीट’चे आश्वासन दिले होते. परंतु, एकाच कुटुंबातून अनेकांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्ष भाजप आणि भारासच्या रडारवर आला आहे. भारासचे रामाराव यांनी काँग्रेसचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यावर ठाम नाही. अशात या पक्षाच्या आश्वासनावर विश्वास तरी कसा ठेवायचा? असा उलटप्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. (Telangana Election 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.