२०२३-२४ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपाने सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे. सहा राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपाचे आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association of Democratic Reforms, एडीआर)च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाचा मोठा भाग निवडणूक रोख्यांद्वारे (Election bonds), देणग्यांमधून आला आहे. माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने ही माहिती शेअर केली आहे. (Political Parties Income)
(हेही वाचा – Ajit Pawar : हतबल दादा, वरचढ भाऊ)
भाजपने (BJP) २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु खर्च उत्पन्नाच्या ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी झाला आहे. काँग्रेसचे (Congress) एकूण उत्पन्न १,२२५.१२ कोटी रुपये होते, तर वर्षभराचा त्यांचा खर्च १,०२५.२५ कोटी रुपये किंवा एकूण उत्पन्नाच्या ८३.६९ टक्के होता, असे अहवालात म्हटले आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात विविध राजकीय पक्षांनी ४,५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले आहेत. या रकमेपैकी ५५.९९ टक्के हा राष्ट्रीय पक्षांचा वाटा होता.
सर्वाधिक देणग्या कुठून मिळाल्या ?
- भाजप – स्वेच्छेने देणगी ३,९६७ कोटी
- काँग्रेस – अनुदान, देणग्या १,१२९ कोटी
- माकप – अनुदान, देगण्या ७४ कोटी
- बसपा – शुल्क व सदस्यत्व २६ कोटी
- आप – अनुदान २२ कोटी
काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ
आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ दरम्यान भाजपच्या उत्पन्नात ८३.८५ टक्क्यांची (१९७९ कोटी रुपयांची) वाढ झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या उत्पन्नातही ४५२ कोटी रुपयांवरून १२२५ कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १७१ टक्के इतकी वाढ झाली आहे. माकपच्या उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ आहे. आप आणि बसपाच्या उत्पन्नात मात्र अनुक्रमे २४ आणि २३ टक्के घट झाली आहे. (Political Parties Income)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community