Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार

याचे ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार. पण जेलऐवजी रुग्णालयाचा आधार घेणारे केदार हे पहिलेच नेते नाहीत. यापूर्वीही अनेक नेत्यांनी कायद्यातील पळवाट काढत रुग्णालयात रहाणेच पसंत केले असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

194
Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार
Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार

कोणत्याही राजकीय नेत्याला राजकीय आंदोलन वगळता एखाद्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जेलमध्ये जाण्यापासून तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी नेते रुग्णालयाचा आधार घेताना दिसतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार. पण जेलऐवजी रुग्णालयाचा आधार घेणारे केदार हे पहिलेच नेते नाहीत. यापूर्वीही अनेक नेत्यांनी कायद्यातील पळवाट काढत रुग्णालयात रहाणेच पसंत केले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. (Politician and Disease)

तब्बल १९ महिने रुग्णालयात

बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणात तत्कालीन शिवसेसनेचे नेते सुरेश जैन यांनी तर तब्बल १९ महिने रुग्णालयात राहून जेलपासून सुटका करून घेतली होती. अखेर एका टीव्ही चॅनेल ने स्टिंग ऑपरेशन करून त्यांची पोलखोल केली तेव्हा त्यांची रवानगी पुन्हा जेलमध्ये झाली. (Politician and Disease)

(हेही वाचा – Coronavirus : भारतात ४२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू)

स्टिंग ऑपरेशनने पोलखोल

१० मार्च २०१२ या दिवशी त्यांना अटक झाली आणि १९ मार्च ला त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालायात दाखल करण्यात आले. तिथे काही दिवस काढल्यानंतर त्यांना जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे ते काही महिने राहिले आणि मग आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाली. जेलमध्ये जेमतेम १० मिनिटे राहिले नाहीत तर त्यांना लगेच जेजे रुग्णालयात नेण्यात आले. तिथे काही दिवस राहून शेवटी सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी अनेक महिने काढले आणि मग त्यांचे दुखणे खरे नसल्याचे सिद्ध होताच त्यांना पुन्हा त्यांचे ‘होम टाऊन’ जळगाव कारागृहात धाडण्यात आले. (Politician and Disease)

महाविकास आघाडीचे नेतेही

अशाच प्रकारे महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री छगन भुजबळ, अनिल देशमुख , नवाब मलिक यांनीही रुग्णालयाचा आधार घेतला मात्र जैन यांच्यानंतर मीडियाच्या दहशतीमुळे फार काळ रुग्णालयात ठेवण्याचे धाडस डॉक्टरांनी केले नसावे. (Politician and Disease)

(हेही वाचा – Megablock : ‘या’ मार्गांवर ब्लॉक, काही लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक)

इतर राज्यातही तीच खेळी

राज्यातीलच नव्हे तर अन्य राज्यातील नेतेदेखील हाच फंडा वापरतात. तामिळनाडू येथील तामिळ मनिला काँग्रेस पक्षाचे मंत्री सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवोन चॅटर्जी हे देखील एका प्रकरणात अटक होताच रुग्णालयात दाखल झाले. (Politician and Disease)

दोन प्रमुख आजारांचा आधार

अशा अटक प्रकरणात मुख्य दोन आजारांचा समावेष केला जातो. मुळात बहुतांश नेते हे पन्नाशी पार केलेले असतात त्यामुळे एकतर हृदयाचा त्रास हे प्रमुख कारण दिले जाते किंवा पोटात दुखतंय हे दुसरे. आणि एकदा रुग्णालयात दाखल झाले कि मग एक ना अनेक चाचण्यांमध्ये वेळकाढूपणा करून रुग्णालयातही मुक्काम वाढवण्यास मदत केली जाते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Politician and Disease)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.