शरद पवारांच्या निकटवर्तीयाची ईडीकडून चौकशी; प्रकरण 500 कोटींच्या घरात!

262

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे  यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पिता पुत्राची तीनवेळा चौकशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयांत ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात आहे.

कधीही होऊ शकते अटक

शेतक-यांच्या घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ पडलीच तर उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याविरोधात आवाज उठवणार असे माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे.

( हेही वाचा: भाजप आणि शिवसेनेत काय झाले ते आम्ही बघू … राऊतांनी घेतला राज ठाकरेंचा समाचार )

इंदिरा गांधींनाही पराभूत व्हावे लागले होते

लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. देशात लोकशाही टिकली ती आमच्यापेक्षा लोकांचे लोकशाहीवर प्रेम आहे म्हणून. आणिबाणीच्या काळात एक निर्णय चुकला त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांना पराभूत व्हावे लागले. पण नंतरच्या लोकांना सत्ता चालवता येत नाही, हे लक्षात आल्यावर दोन वर्षांत इंदिरा गांधींना सत्ता दिली. याचा अर्थ लोक शहाणे आहेत. आज जे काही उद्योग सुरू आहेत. याला अटक कर, त्याला आत टाक, धमक्या दे याचा अर्थ काय समजायचा. अनिल देशमुख यांच्यावर आरोप 100 कोटी गोळा करा असे सांगितले. पहिली चार्जशीट 100 कोटी गोळा केला आरोप. नंतर दुरुस्त केली, 4 कोटी 70 लाख. नंतर पुन्हा दुरुस्त 1 कोटी 7 लाख झाला. म्हणजे हे शंभर टक्के खोटे आहे. तपास यंत्रणा कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकांना समजते. लोकांत संताप आणि नाराजी आहे हे योग्यवेळी दिसेल असेही शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.