Politics : राजकारणातील शह-काटशह

54
Politics : राजकारणातील शह-काटशह
Politics : राजकारणातील शह-काटशह
  • सुजित महामुलकर
गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय संस्कृती बदलत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी असो की विरोधी पक्ष, सतत एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न होत असल्याचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची परिस्थिती पंख छाटलेल्या पाखरासारखी झाल्याचे दिसते. आकाशात झेपावण्याचा प्रयत्न करत, जमिनीवरच उड्या मारण्याचे त्यांचे प्रकार सुरू आहेत. शिवसेना उबाठा, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांची अवस्था सत्ता नसल्याने ‘पाण्याविना मासा’ अशी काहीशी झाल्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आपल्या घटक पक्षांना ‘शिस्तीचे धडे’ देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Politics News)

राजकीय पक्ष ते एक ‘गट’

आठवडाभरातील काही घटना लक्षात घेता, याची प्रतीची आल्याशिवाय रहात नाही. ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेंचं इतकं कौतुक केलं, पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे ‘ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने गेल्याचं’ या समारंभात सांगून उद्धव ठाकरे यांना बुचकळ्यात टाकले. अर्थात त्यावर अपेक्षित प्रतिक्रियाही पवार यांनी अनुभवली. आता ‘बाप चोरला’ असा सतत जप करण्याऱ्या उबाठाला शरद पवार (Sharad Pawar) पित्यासमान वाटू लागले आहेत.

(हेही वाचा – Sambhal मध्ये ८७ तीर्थक्षेत्र, ५ महातीर्थ; योगी सरकार संभलला करणार ‘तीर्थ नगरी’ म्हणून विकसित)

शरद पवार, गेली ६० वर्षे संसदीय राजकारणात (Politics) सक्रिय आहेत. देशातील अगदी मोजक्या बुजुर्ग राजकारण्यांपैकी ते एक. असे असताना आपण काय बोललो आणि त्याचे परिणाम काय होणार, याचे भान पवारांना नाही, हे जर शिवसेना उबाठाला समजत नसेल तर एक राजकीय पक्ष ते एक ‘गट’ इथपर्यंत त्यांचा प्रवास हा अपरिहार्य आहे, असेच म्हणावे लागेल. पवार यांनी शिंदे यांचे कौतुक करून, जसे उद्धव ठाकरे यांना उघडे पाडले, तसे शिंदे यांनी शरद पवारांशी (Sharad Pawar) जवळीक वाढवून ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना एक ‘अनाहूत संदेश’ देण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे.

शिंदे धाडस करतील?

शिंदे हे ठाकरे यांच्या विरोधात काही शह-काटशह करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, फडणवीस हे एक वेगळे रसायन असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले असेलच. फडणवीस यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांच्याबाबत शिंदे काटशहाचे ‘धाडस’ करतील, याची शक्यता कमी दिसते. राज्याच्या राजकारणात (Politics) अनेक दिग्गजांना जमले नाही ते फडणवीस यांनी करून दाखवले आहे. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांना राजकारणात (Politics) जेरीस आणणारा तरुण नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस, (CM Devendra Fadnavis) अशी त्यांची ख्याती झाली आहे. याची प्रचिती गेल्या काही विधान परिषद, राज्य सभा निवडणुकीत आलीच. पण नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना चितपट केल्याचेही दिसले. लोकसभेला सर्वाधिक ‘स्ट्राइक रेट’ असलेले पवार, केवळ सहा महिन्यात विधानसभेला ‘स्ट्राइक रेट’ मध्ये शेवटच्या स्थानी गेले तर याउलट भाजपाने शेवटच्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर मजल मारली. अशात फडणवीस यांच्याविरोधात शिंदे ‘छुपं युद्ध’ (कोल्ड वॉर) करतील, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अॅण्ड साऊंड शो पाहून झाले प्रभावित)

कक्ष तेव्हाही होता, आताही आहे

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षा’ला टक्कर देण्यासाठी शिंदें यांच्यामार्फत येत्या ४ मार्चला ‘उपमुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे आणि हा कक्ष मंत्रालयातच असणार आहे, असे म्हटले जाते. वास्तविक, शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनीही ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष’ स्थापन केला होता. त्यामुळे गेल्या २-३ वर्षात हे दोन्ही कक्ष अस्तित्वात होते आणि आहेत, त्यामुळे यात टक्करचा मुद्दा येतो कुठे? असा प्रश्न निर्माण होतो.

शिंदेंच्या मंत्र्यांच्या विभागात भाजपाचा वाढलेला हस्तक्षेप, मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करणे, पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला तिढा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला शिंदेंनी मारलेल्या दांड्या, काही निर्णय बदलले यावरून दोन प्रमुख नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येते, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी प्रशासनातील विस्कटलेली घडी सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Ind Vs Pak : पाकिस्तानला सलग दुसरा झटका, बाबर आझम आणि इमाम आऊट)

नो ‘कोल्ड वॉर’ नो ‘हॉट वॉर’

राज्याचा प्रमुख म्हणून शिस्तीचा बडगा उगारणे, हे स्वाभाविक आहे. यामुळेच वरवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात ‘कोल्ड वॉर’ असे चित्र दिसून येते. यावर फडणवीस आणि शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे यांनी तर स्पष्टच सांगितले की, ‘आमच्यात कुठेलही ‘कोल्ड वॉर’ नाही. कुठलेही ‘हॉट वॉर’ नाही. आमचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास करणे. जनतेला दिलासा देणे, आणि आम्ही गेली अडीच वर्षे टीम म्हणून काम केले त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. तब्बल २३२ आमदार निवडून आले. त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतो आहोत आणि त्याच वेगाने महाराष्ट्राला पुढे नेत आहोत, असेही शिंदे म्हणाले.

‘राजकीय लाभा’साठी तडजोड; संसारातील ‘कुरबुरी’

मुळात शिवसेना-भाजपा युती ही ‘हिंदुत्व’ या विचारधारेवर आधारित आहे. शिवसेना एकसंघ आणि युतीत असतानाही या दोन्ही पक्षात एकमेकांवर टीका-टिप्पणी होत होती. याउलट शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ही आघाडी म्हणजे केवळ ‘राजकीय लाभा’साठी झालेली तडजोड असल्याने त्यांच्यातील ‘बेबनाव’ आणि शिवसेना-भाजपाच्या संसारातील ‘कुरबुरी’ असा मूलभूत फरक म्हटले तर वावगे ठरू नये.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.